Monday 15 August 2022

तुळजापुर तहसील कार्यालयात आझादी का अमृत महोत्सव साजरा

आझादी_का_अमृत_महोत्सव_दिन_तुळजापुर_तहसीलमध्ये_साजरा

आझादी का अमृत महोत्सव दिन  तुळजापुर तहसील मध्ये मोठ्या उत्साहाने , आनंदाने साजरा करण्यात आला. यावेळी मा. तहसीलदार तांदळे साहेब, यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तुळजापुर नगराचे पोलीस निरीक्षक यांनी ध्वजाला सलामी आणि राष्ट्रगीत गाण्याची घोषणा दिली. या वेळी कुलस्वामिनी माध्यमिक विद्यालयातील भालेराव सर व उच्च माध्यमिक विदयालयातील विदयाथीँनींनी अतिशय उत्कृष्ट राष्ट्रगीत गायले. राष्ट्रगीतानंतर भालेराव सरांनी घोषणा दिल्या. त्यांच्या पहाडी बहारदार आवाजाने तहसील परीसर दणाणून निघाला. कुलस्वामीनी उच्च माध्यमिक विदयालयाला मोठा मान मिळवण्यासाठी डाँ. प्रा.बिराजदार गणेश प्रा. कबाडे संजय, माध्यमिक विदयालयातील सहशिक्षक बिराजदार प्रदिप सर यांनी प्रयत्न केला या मानासाठी वरील प्राध्यापक, सहशिक्षक यांचा मोलाचा वाटा आहे़. तहसील मधील जनसमुदयानी कुलस्वामीनी उच्च माध्यमिक विदयालयातील विदयाथीँनींचे  व शिक्षकांचे गुणगौरव केला. मा़. तहसीलदार साहेबांनी पाठीवर कौतुकाची थाप दिली.



श्री कुलस्वामिनी विद्यालय येथे स्वातंत्र्याचा आमृत उत्सव साजरा






 दिनांक 15 ऑगस्ट श्री कुलस्वामिनी विद्यालयामध्ये भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ठीक साडेसात वाजता मुख्याध्यापक तथा प्राचार्य ठोंबरे सर यांच्या हस्ते तिरंगा ध्वज फडकवण्यात आला त्यानंतर राष्ट्रीय झेंड्याला सलामी देऊन सामुहिक राष्ट्रगीत झाले. यानंतर श्रीमती अहंकारी मॅडम यांच्यासमवेत ध्वज प्रशंसा गीत झाले. त्यानंतर भालेराव सरांच्या घोषणांनी कुलस्वामिनी परिसरातील आसमंत निनादून गेले. स्वातंत्र्य दिन सोहळ्यासाठी उपस्थित राहिलेल्या मान्यवरांचे ठोंबरे सरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले त्यानंतर तुळजापूर शहरातून प्रभात फेरीचे संचलन करण्यात आले. या संचालनात हजार पेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते ते शहराच्या मुख्य रस्त्यातून ही प्रभात फेरी घोषणा देत निघाली होती.  त्यानंतर प्रभात फेरीचे विसर्जन झाले. विसर्जनानंतर विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. वक्तृत्व आणि निबंध स्पर्धेत प्रथम आलेल्या कुमारी शुभांगी दरेकर हीचा तालुक्यातून प्रथम आल्याबद्दल सत्कार करण्यात आले प्रभात फेरीमध्ये विद्यार्थी शहरवासी यांचे लक्ष वेधून घेत होते. ही वेशभूषा आगळीवेगळी आणि सुरेख दिसत होती. नंतर विद्यार्थी मनोगत, ठोंबरे सरांचे मार्गदर्शन आजच्या पहिल्या सत्रातील कार्यक्रमाची सांगता झाली. याप्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते मोठ्या उत्साहात हा सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी कुलस्वामिनी परिवारातील सर्व सहकारी अध्यापक, प्राध्यापक बंधूभगिनी हिरीरीने सहभागी होते. तसेच स्वच्छ गणवेशात बहुसंख्य विद्याथी उपस्थित होते. हा कार्यकम यशस्वी करण्यासाठी सर्वांचे सहकार्य लाभले.


Wednesday 20 May 2020


कोरोनाच्या संकटकाळात ग्रामीण भागातील हातावर पोट असणारे गरीब निराधार विधवा महिला अशा 100 गर्जुना प्रत्येकी 500 रु ची आर्थिक मदत शिक्षण महर्षी सि ना आलूरे गुरुजी यांनी अणदूर मध्ये दिली आहे

अणदूर(वार्ताहर) किरण कांबळे सह लक्ष्मण दुपारगुडे
कोरोनाच्या संकटकाळात ग्रामीण भागातील हातावर पोट असणारे गरीब निराधार विधवा महिला अशा 100 गर्जुना प्रत्येकी 500 रु ची आर्थिक मदत शिक्षण महर्षी सि ना आलूरे गुरुजी यांनी अणदूर मध्ये दिली आहे
समाजावर जेव्हा जेव्हा अशी नैसर्गिक आपत्ती आली तेव्हा तेव्हा गुरुजींनी अशी मदत केली असून सध्या धान्य किराणा माल यांची मदत मोठ्या प्रमाणात होत आहे परंतु दवाखाना औषधे याला गरीबाजवळ पैसे च नाहीत ही अडचण लक्ष्यात घेऊन माजी सरपंच दशरथ गायकवाड यांनी अशा गरजू 100 लोकांची यादी तयार केली त्यांना प्रत्येकी 500 रु प्रमाणे 50000 रु सि ना आलूरे गुरुजी यांनी दिले आहेत त्यामध्ये 16 महिला या विधवा आहेत त्या कुटुंबाच्या आधार आहेत त्यांना अशा काळात केलेली मदत निश्चितच उपयोगी आहे पूर आला, भूकंप झाला या काळात गुरुजींनी फार मोठी आर्थिक मदत वेळोवेळी केली असून कोरोना संकटाच्या काळात गर्जुना केलेली ही मदत लाख मोलाची ठरली आहे माजी सरपंच दशरथ गायकवाड ,माजी उपसरपंच सोपान घुगे यांच्या हस्ते ही रोख मदत गर्जुना देण्यात आली

Monday 18 May 2020

📱📱⭕ *ऑनलाइन निकाल जाहीर*⭕📱📱
*शिक्षण प्रसारक मंडळ अनदुर* संचलित *श्री कुलस्वामिनी विद्यालय, तुळजापूर* येथील *वर्ग ९ वी (क)* चा ऑनलाईन निकाल जाहीर करण्यात आलेला आहे.

👉दिलेल्या pdf फाईल मध्ये सर्व विद्यार्थ्यांचे हजेरी क्रमांक. दिलेले आहेत.
👉विद्यार्थ्यांनी त्यांच्या हजेरी क्रमांकावर क्लिक करावे.
👉Browser वर निकाल ओपन होईल.
👉पासवर्ड विचारले असता विद्यार्थांनी जन्मतारीख नमूद करावे जसे रोल नं. *03* साठी *28/06/2005* ही जन्मतारीख असल्यास *28062005* असा पासवर्ड लिहावा व submit वर क्लिक करावे, निकाल पत्रक मिळेल.



       📱📱 *जाधव रमेश हरिबा*📱📱
                        स. शिक्षक
   श्री कुलस्वामिनी विद्यालय, तुळजापूर
1) https://bit.ly/3g0SvVJ
2) https://bit.ly/2z8a5GN

Wednesday 12 June 2019

दहावीतील सेमी माध्यमातून विज्ञान विषयातील प्रथम तीन                                       #कुलस्वामिनी_विद्यालयाची_यशाची_परंपरा_कायम-
श्री. कुलस्वामिनी विद्यालय, तुळजापूर या शाळेचा  इ.10 वीतील #सेमी_माध्यमाचा_निकाल                                                                         🌹💐💐अभिनंदन 🌹💐💐
  यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक सचिव शिक्षणमहर्षी आदरणीय *श्री.सि.ना.आलुरे गुरूजी* , सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
शाळेतील प्रथम तीन विद्यार्थी                                                                          #कुलस्वामिनी_विद्यालयाची_यशाची_परंपरा_कायम-
श्री. कुलस्वामिनी विद्यालय, तुळजापूर या शाळेचा  इ.10 वीतील #सेमी_माध्यमाचा_निकाल                                                                         🌹💐💐अभिनंदन 🌹💐💐
  यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक सचिव शिक्षणमहर्षी आदरणीय *श्री.सि.ना.आलुरे गुरूजी*  सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
इ.10 वी (सेमी) वर्गाचा मार्च -2019 चा निकाल                          #कुलस्वामिनी_विद्यालयाची_यशाची_परंपरा_कायम-
श्री. कुलस्वामिनी विद्यालय, तुळजापूर या शाळेचा  इ.10 वीतील #सेमी_माध्यमाचा_निकाल                                                                         🌹💐💐अभिनंदन 🌹💐💐
  यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक सचिव शिक्षणमहर्षी आदरणीय *श्री.सि.ना.आलुरे गुरूजी*  सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.