Monday 15 August 2022

श्री कुलस्वामिनी विद्यालय येथे स्वातंत्र्याचा आमृत उत्सव साजरा






 दिनांक 15 ऑगस्ट श्री कुलस्वामिनी विद्यालयामध्ये भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ठीक साडेसात वाजता मुख्याध्यापक तथा प्राचार्य ठोंबरे सर यांच्या हस्ते तिरंगा ध्वज फडकवण्यात आला त्यानंतर राष्ट्रीय झेंड्याला सलामी देऊन सामुहिक राष्ट्रगीत झाले. यानंतर श्रीमती अहंकारी मॅडम यांच्यासमवेत ध्वज प्रशंसा गीत झाले. त्यानंतर भालेराव सरांच्या घोषणांनी कुलस्वामिनी परिसरातील आसमंत निनादून गेले. स्वातंत्र्य दिन सोहळ्यासाठी उपस्थित राहिलेल्या मान्यवरांचे ठोंबरे सरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले त्यानंतर तुळजापूर शहरातून प्रभात फेरीचे संचलन करण्यात आले. या संचालनात हजार पेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते ते शहराच्या मुख्य रस्त्यातून ही प्रभात फेरी घोषणा देत निघाली होती.  त्यानंतर प्रभात फेरीचे विसर्जन झाले. विसर्जनानंतर विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. वक्तृत्व आणि निबंध स्पर्धेत प्रथम आलेल्या कुमारी शुभांगी दरेकर हीचा तालुक्यातून प्रथम आल्याबद्दल सत्कार करण्यात आले प्रभात फेरीमध्ये विद्यार्थी शहरवासी यांचे लक्ष वेधून घेत होते. ही वेशभूषा आगळीवेगळी आणि सुरेख दिसत होती. नंतर विद्यार्थी मनोगत, ठोंबरे सरांचे मार्गदर्शन आजच्या पहिल्या सत्रातील कार्यक्रमाची सांगता झाली. याप्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते मोठ्या उत्साहात हा सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी कुलस्वामिनी परिवारातील सर्व सहकारी अध्यापक, प्राध्यापक बंधूभगिनी हिरीरीने सहभागी होते. तसेच स्वच्छ गणवेशात बहुसंख्य विद्याथी उपस्थित होते. हा कार्यकम यशस्वी करण्यासाठी सर्वांचे सहकार्य लाभले.


No comments:

Post a Comment