Wednesday 20 May 2020

कोरोनाच्या संकटकाळात ग्रामीण भागातील हातावर पोट असणारे गरीब निराधार विधवा महिला अशा 100 गर्जुना प्रत्येकी 500 रु ची आर्थिक मदत शिक्षण महर्षी सि ना आलूरे गुरुजी यांनी अणदूर मध्ये दिली आहे

अणदूर(वार्ताहर) किरण कांबळे सह लक्ष्मण दुपारगुडे
कोरोनाच्या संकटकाळात ग्रामीण भागातील हातावर पोट असणारे गरीब निराधार विधवा महिला अशा 100 गर्जुना प्रत्येकी 500 रु ची आर्थिक मदत शिक्षण महर्षी सि ना आलूरे गुरुजी यांनी अणदूर मध्ये दिली आहे
समाजावर जेव्हा जेव्हा अशी नैसर्गिक आपत्ती आली तेव्हा तेव्हा गुरुजींनी अशी मदत केली असून सध्या धान्य किराणा माल यांची मदत मोठ्या प्रमाणात होत आहे परंतु दवाखाना औषधे याला गरीबाजवळ पैसे च नाहीत ही अडचण लक्ष्यात घेऊन माजी सरपंच दशरथ गायकवाड यांनी अशा गरजू 100 लोकांची यादी तयार केली त्यांना प्रत्येकी 500 रु प्रमाणे 50000 रु सि ना आलूरे गुरुजी यांनी दिले आहेत त्यामध्ये 16 महिला या विधवा आहेत त्या कुटुंबाच्या आधार आहेत त्यांना अशा काळात केलेली मदत निश्चितच उपयोगी आहे पूर आला, भूकंप झाला या काळात गुरुजींनी फार मोठी आर्थिक मदत वेळोवेळी केली असून कोरोना संकटाच्या काळात गर्जुना केलेली ही मदत लाख मोलाची ठरली आहे माजी सरपंच दशरथ गायकवाड ,माजी उपसरपंच सोपान घुगे यांच्या हस्ते ही रोख मदत गर्जुना देण्यात आली

No comments:

Post a Comment